ITSE परीक्षेत कणकवली 3 नं. शाळेचा डंका ; स्वराज कुंभार राज्यात 3 रा

अखिलेश उमेश बुचडे जिल्ह्यात 2 रा
Edited by: उमेश बुचडे
Published on: March 31, 2023 15:50 PM
views 112  views

कणकवली : कणकवली येथील सद्गुरु भालचंद्र महाराज विद्यालय जि प शाळा कणकवली क्रमांक तीन च्या विद्यार्थ्यांनी ITSE परीक्षेत नेत्र दीपक यश मिळवले आहे. या शाळेतील इयत्ता पहिलीचा स्वराज तानाजी कुंभार हा विद्यार्थी 200 पैकी 196 गुण मिळवून राज्यात तिसरा आला आहे. तर इयत्ता पहिलीचे विद्यार्थी अखिलेश उमेश बुचडे 186 गुण जिल्ह्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे.

हार्दीका सागर राणे 176 गुण जिल्ह्यात तिसरा तर श्रीनिवास गणेश वडर 168 गुण जिल्ह्यात पाचवा आले आहेत. इयत्ता दुसरीचा अनामी अमोल कांबळे 200 पैकी 180 गुण मिळवून जिल्ह्यात पहिला तर कश्यप विजय वातकर 200 पैकी 170 गुण मिळवून जिल्ह्यात तिसरा आला आहे. इयत्ता पाचवी ची गाथा अमोल कांबळे 300 पैकी 282 गुण मिळवून जिल्ह्यात पहिली आली आहे. इयत्ता सहावीचे विद्यार्थी संतोषी सुशांत आळवे तीनशे पैकी 234 गुण मिळवून जिल्ह्यात प्रथम वरद उदय बाक्रे 226 गुण मिळवून जिल्ह्यात द्वितीय तर श्रुती संतोष चव्हाण २१८ गुण मिळवून जिल्ह्यात तृतीय आले आहेत.

इयत्ता सातवीचा भालचंद्र रवींद्र सावंत 300 पैकी 218 गुण मिळवून जिल्ह्यात पाचवा आला आहे. तर इयत्ता पहिलीचे सेजल संतोष चव्हाण, अनन्या अमित कांबळे संस्कार साहेब मोटे इयत्ता दुसरीचा गौरेश संतोष सावंत इयत्ता तिसरीचा मयंक  रविकांत बुचडे, इयत्ता पाचवी ची भूमी रवींद्र कांदळकर, इयत्ता सहावीचे संजना सदानंद कांबळे व विघ्नेश राजेश तेली तर इयत्ता सातवीचा अनिल ठाकूर या विद्यार्थ्यांनी कणकवली केंद्रात क्रमांक प्राप्त केले आहेत.

या शाळेचा एक विद्यार्थी राज्यस्तरावर दहा विद्यार्थी जिल्हास्तरावर तर नऊ विद्यार्थी केंद्रस्तरावर गुणवत्ता यादीत आले आहेत. या सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या वर्गशिक्षकांचे मार्गदर्शन लाभले आहे. विद्यार्थ्यांच्या या उज्वल यशाबद्दल मुख्याध्यापिका वर्षा कर्ंबेळकर व शाळेतील सर्व शिक्षक वृंद तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रवींद्र सावंत उपाध्यक्ष  सायली राणे सर्व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. पालक वर्गातूनही या विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक होत आहे.