कणकवली न.पं.तीत उदयोजकता विकास कार्यक्रमाचा शुभारंभ

Edited by: उमेश बुचडे
Published on: February 24, 2024 06:52 AM
views 88  views

कणकवली : कणकवली नगरपंचायत दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत वैयक्तिक स्वयंरोजगार व बचत गट यांना अभियानातून कर्ज देण्यात येथे  कर्ज घेतलेले वैयक्तिक लाभार्थी किंवा बचत गट यांना उद्योग व्यवसाय यांची माहिती व्हावी या उद्देशान उदयोजकता विकास कार्यक्रमचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उदघाटन कणकवली नगरपंचायत मुख्यअधिकारी परितोष कंकाळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कनकसिंधु शहर स्तर संघ अध्यक्ष  सुचिता पालव, तज्ञ मार्गदर्शक तुकाराम दळवी, सहाय्यक प्रकल्प अधिकारी अमोल भोगले, कनकसिंधु शहर स्तर संघ कार्यकारणी सदस्य, व्यवस्थापक,  लाभार्थी व बचत गट सदस्य उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना मुख्यअधिकारी श्री.कंकाळ म्हणाले की, महिला बचत गट यांनी उद्योग व्यवसाय करणे आवश्यक असून यासाठी इतर योजना सोबतच 75 % अनुदान देणाऱ्या सिंधुरत्न योजनेचा जास्तीत जास्त गटांनी लाभ घेऊन व्यवसाय सुरु करावा व स्वतः सोबत इतरांना ही रोजगार देणारे बनावे. सर्व उत्पाद्दीत मालाचे एकच ब्रँडिंग केल्यास मार्केट मिळण्यास सोपे होईल. महिलांनी मसाले, पिठ, लोणची या उत्पादन व्यतिरिक्त काजू प्रक्रिया, काथ्या व्यवसाय अश्या इतर व्यवसायांचाही विचार करावा. यासाठी नगर पंचायतच्या माद्यमातून सर्व सहकार्य करण्यात येईल असे ही ते म्हणाले.यासाठी सध्या सोनचैरिया शहर उपजीविका केंद्राच्या माद्यमातून  बचत गट महिलांनी उत्पादीत केलेल्या मालाची विक्री व बाजारपेठ मिळवून देण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आले आहे. याचाही लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

 उद्योजकता विकास प्रशिक्षण हे तीन दिवसीय अनिवासी असून या मध्ये उद्योजकीय व्यक्तिमत्व, गुण, वित्तीय योजना, मार्केटसर्व्हे , उद्योग व्यवस्थापन, उद्योग निवड, उद्योग टप्पे, प्रकल्प अहवाल अश्या विविध विषयावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.