
सावंतवाडी : कॉग्रेसच्या माध्यमातून साक्षी वंजारी यांनी नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला असून यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी झाली आहे. महायुतीनंतर आता आघाडीतही फुट पडली आहे.
शक्तीप्रदर्शन करत कॉग्रेसच्या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. यावेळी माजी नगराध्यक्ष ॲड. दिलीप नार्वेकर, तालुकाध्यक्ष अभय मालवणकर, माजी नगरसेवक सुनील पेडणेकर, अरूण भिसे, ॲड. राघवेंद्र नार्वेकर, समीर वंजारी, तौकीर शेख, बाळा नमशी, संजय लाड, कौस्तुभ पेडणेकर आदी काँग्रेसचे उमेदवार व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.










