राष्ट्रवादीचे अबीद नाईक यांचा उमेदवारी अर्ज दाखल

Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: November 17, 2025 12:39 PM
views 220  views

कणकवली : कणकवली नगरपंचायत निवडणुकीसाठी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष आणि माजी नगरसेवक अबिद नाईक यांनी आज सोमवारी प्रभाग १७ मधून उमेदवारी अर्ज दाखल केला. याप्रसंगी जिल्हाभरातून राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रवादी - भारतीय जनता पक्ष युतीचा, विजय असो अशा जोरदार घोषणा यावेळी देण्यात आल्या. 

विकासाच्या अजेंड्यावर ही निवडणूक लढविणार असल्याचे यावेळी अबिद नाईक यांनी जाहीर केले. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी श्री देव महापुरुषाला विजयासाठी साकडे घालण्यात आले. यावेळी त्यांच्यासोबत माजी उपनगराध्यक्ष रवींद्र गायकवाड, संजीवनी पवार, विठ्ठल देसाई यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.