संदेश पारकरांसह शहर विकास आघाडीचे उमेदवार उद्या दाखल करणार अर्ज

Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: November 16, 2025 20:44 PM
views 69  views

कणकवली : कणकवली नगरपंचायत निवडणूकीसाठी  माजी नगराध्यक्ष तथा शहर विकास आघाडीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार संदेश पारकर यांच्यासह शहर विकास आघाडीचे नगरसेवक पदाचे सर्व १७ उमेदवार उद्या सोमवारी सकाळी ११ वाजता कणकवली तहसील‌ उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी पारकर समर्थक व शहर विकास आघाडीतर्फे जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे. 

उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी संदेश पारकर व शहर विकास आघाडीचे उमेदवार कणकवलीचे ग्रामदैवत श्री देव स्वयंभू मंदिर येथे दर्शन घेऊन तेथून कणकवली तहसील कार्यालयाबाहेर शक्तीप्रदर्शन करणार आहेत. कणकवलीकर नागरिकांनी शहर विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन संदेश पारकर यांनी केले आहे.‌ 

दरम्यान शहर विकास आघाडीची घोषणा झाली व संदेश पारकर हेच नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असल्याचे जाहीर झाले असले तरी या आघाडीचे नगरसेवक पदाचे उमेदवार कोण असणार, याचीही उत्सुकता मतदारांना लागू राहिली आहे.