
कणकवली : अखेर मागील काही दिवसांपासून शांत असलेल्या उबाठा शिवसेना जिल्हाप्रमुख तथा कणकवलीचे माजी नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी या नगरपंचायत निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष पदासाठी लढणार असल्याचे जाहीर केले. आपल्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत संदेश पारकर यांनी ही घोषणा केली. ही निवडणूक आपण शहर विकास आघाडीच्या माध्यमातून लढवत असल्याचेही पारकर म्हणाले. गतवेळेच्या सत्ताधाऱ्यांनी शहरात मोठा भ्रष्टाचार केला आहे. त्या विरोधातच सर्वसामान्य कणकवलीकरांनी मी निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली त्यानुसार सर्वांना सोबत घेऊन ही निवडणूक मी लढवणार आहे. हे निवडणूक आम्ही कोणत्याही पक्षाच्या चिन्हावर लढवणार नसल्याचेही पारकरी यांनी स्पष्ट केले.










