समीर नलावडे यांचा नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल

दिवसभरात नगरसेवक पदासाठी १० अर्ज दाखल | सर्व अर्ज भाजपचेच
Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: November 15, 2025 17:02 PM
views 196  views

कणकवली : कणकवली नगरपंचायत निवडणुकीसाठी शनिवारी भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समीर नलावडे यांनी अर्ज दाखल केला. नलावडे यांच्यासोबत‌ भाजपच्या दहा जणांनी नगरसेवक पदासाठी अर्ज दाखल केला.

प्रभाग ३ मधून राणे स्वप्निल शशिकांत,  प्रभाग ४ मधून मुरकर माधवी महेंद्रकुमार, प्रभाग ५ मधून गांगण मेघा अजय, प्रभाग ६ मधून अंधारी स्नेहा महेंद्र, प्रभाग ७ मधून नलावडे सुप्रिया समीर, प्रभाग ८ मधून‌ खुडकर गौतम शरद, प्रभाग १२ मधून ठाणेकर मनस्वी मिथुन, प्रभाग १४ मधून कोदे सुरेंद्र सुधाकर, प्रभाग १५ मधून रासम विश्वजीत विजयराव, प्रभाग १६ मधून‌ कामतेकर संजय मधुकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.