समीर नलावडे उद्या भरणार उमेदवारी अर्ज

Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: November 14, 2025 10:49 AM
views 347  views

कणकवली :  कणकवली नगरपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने आता जोरदार रणधुमाळी सुरू झाली असून भाजपतर्फे गतवेळचे नगराध्यक्ष समीर नलावडे हे उद्या शनिवारी नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करणार आहेत. भाजपतर्फे दोनच दिवसांपूर्वी नगरपरिषदा व कणकवली नगरपंचायत निवडणुकीतील इच्छुकांच्या मुलाखती पार पडल्या.

यामध्ये कणकवली नगरपंचायत नगराध्यक्ष पदासाठी केवळ समीर नलावडे हेच इच्छुक होते. साहजिकच पक्षातर्फे त्यांची उमेदवारी निश्चित असून ते उद्याच उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.