
कणकवली : कणकवली नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोग ॲक्शन मोडवर आल्याचे पाहायला मिळत आहे. निवडणूक आयोगाकडून कणकवली शहरात नडवे रस्त्या, शासकीय विश्रामगृह समोर आणि जाणवली ब्रिज नजीक अशी पथके सध्या तैनात करण्यात आली आहेत. या स्थिर सर्वेक्षणच्या पथका कडून कणकवलीत शहरात येणाऱ्या वाहनांची तपासणी करणे व त्याच्याकडून काही आक्षेपार्य वस्तू किंवा रोकड अमली पदार्थ आढळल्यास कारवाई करणे असे या स्थिर सर्वेक्षण पथकाचे काम असल्याने निवडणूक आयोग ॲक्शन मोडवर आल्याचे पाहायला मिळत आहे.
मतदारांनी कुठल्याही आमिषाला बळी न पडता निर्भीडपणे मतदानाचा हक्क बजावा हाच उद्देश निवडणूक आयोगाचा असल्याने कणकवली शहरात हे स्थिर सर्वेक्षण पथक तैनात करण्यात आल आहे. या पथकामध्ये पोलीस, महसूल , कृषी आरोग्य बांधकाम जिल्हा परिषद या सर्वच विभागातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.










