
कणकवली : नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कणकवलीचे माजी नगराध्यक्ष तथा उबाठा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांच्यातर्फे आज मंगळवारी सायंकाळी कणकवलीत पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र काही खासगी कारणास्तव पत्रकार परिषद रद्द झाल्याची माहिती संदेश पारकर यांचे बंधू तथा कणकवलीचे माजी उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर यांनी दिली आहे.
संदेश पारकर यांनी मंगळवारी सकाळच्या सुमारास आपल्या निवासस्थानी कणकवली शहरातील महाविकास आघाडीचे कार्यकर्ते व अन्य काही नागरिकांसमवेत बैठक घेतली. सदर बैठकीत संदेश पारकर यांनीच नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवावी, अशी आग्रही मागणी करण्यात आली होती. पारकर यांनीही ही मागणी मागणी मान्य केल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली होती. तर त्याच अनुषंगाने पारकर यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. पत्रकार परिषदेत पारकर आपली भूमिका स्पष्ट करणार होते. मात्र काही खाजगी कारणास्तव पत्रकार परिषद रद्द झाल्याची माहिती कन्हैया पारकर यांनी दिली आहे.










