
कणकवली : नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कणकवली शहरातील कनकनगर-शिवशक्तीनगर येथील कार्यकर्त्यांनी कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, भाजपा शहराध्यक्ष सुरेंद्र उर्फ अण्णा कोदे, युवामोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, महादेव उर्फ ऋतिक नलावडे यांच्या उपस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. अनादी साईल, साहिल परब , प्रथमेश पांगम , ओंकार पांगम , विकास पांगम , सुयोग कदम , भार्गव रायकर , प्रथमेश शिंदे , योगेश बाईत , रोहित जाधव इत्यादी तरुणांनी भाजपचा झेंडा हाती घेतला. प्रवेश कर्त्यांचा योग्य सन्मान राखला जाईल अशी ग्वाही समीर नलावडे यांनी दिली.










