
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सध्या महायुती होणार की नाही यावर अजून शिक्कामोर्तब झालं नाही. तरीदेखील काल कणकवली शहरात भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून महायुती मधील सर्वच नेत्यांचे फोटो असलेली कमान शहरात उभी करण्यात आली होती. त्यानंतर माध्यमांमधून महायुती झाली अशा चर्चांना उधाण आले होते. पण आता याच ठिकाणी या बॅनरवर महायुती मधील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व स्थानिक आमदार निलेश राणे यांचे फोटो या बॅनरवरून हटवण्यात आलेला आहे. त्यामुळे कणकवलीत युती होणार नसल्याचे या बॅनर वरून आता दिसत आहे.
कालपासून नगरपंचायत निवडणूक मंचा रणसंग्राम सुरू झाला असूनही अद्याप पर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युतीचा तिढा कायम असल्याने स्थानिक पदाधिकारी व इच्छुक उमेदवार मात्र कमालीचे युतीबाबत संभ्रमात आहेत.










