
कणकवली : फोंडा चेकपोस्टजवळ कणकवली पोलिसांनी विनापरवाना गुरांची वाहतूक रोखली. या कारवाईत ४ पाडे आणि १ गाय तसेच वाहतुकीसाठी वापरलेला मालवाहू टेम्पो जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई ६ नोव्हेंबर रोजी रात्री १०.२५ वा.च्या सुमारास फोंड - गांगोवाडी घणसकोंड गणपतीसानानजीक करण्यात आली.
याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सुनिल सत्यवान निकम यांच्या फिर्यादीवरून मनोहर अनंत पाटकर (६१, रा. फॉडा, गांगो पिंपळवाडी), विश्वास विनायक पारकर (६६, रा. फोंडा बाजारपेठ) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस कॉन्स्टेबल सुनिल निकम आणि श्री. फाळके हे फोंडा चेकपोस्ट कार्यरत असताना कणकवली पोलीस ठाण्यातून त्यांना बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी गुरे वाहतूक करणारा टेम्पो थांबविल्याची माहिती मिळाली. पोलीस उपनिरीक्षक पवन कांबळे आणि हवालदार सुभाष शिवगण यांच्यासह पोलीस पथक तातडीने घटनास्थळी दाखाल झाले. घटनास्थळी महिंद्रा कंपनीच्या 'लोडकिंग मॉडेलचा, (एम एच ०९ ई एम ०२५६) पांढऱ्या रंगाचा टेम्पो कोल्हापूरच्या दिशेने उभा असलेला आढळला.
टेम्पोच्या हौद्यामध्ये ४ पाडे आणि १ गाय अशी एकूण ५ जनावरे अत्यंत दाटीवाटीने, निर्दयीपणे व चान्या-पाण्याच्या सोयीशिवाय बांधलेली आढळून आली. वाहन चालक आणि गुरांच्या मालकाकडे गुरे वाहतुकीचा कोणताही वैध परवाना आढळला नाही. मनोहर पाटकर व गुरांचा मालक विश्वास पारकर यांनी संगनमत करून, विनापरवाना, निर्दयीपणे आणि जनावरांच्या चाऱ्या-पाण्याच्या सोयीशिवाय वाहतूक केल्याप्रकरणी त्यांच्यावर 'महाराष्ट्र प्राणी रक्षण अधिनियम, १९७६ आणि 'प्राण्यांना निर्दयतेने वागधण्यास प्रतिबंध अधिनियम १९६० तसेच संबंधित कायद्यांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास कणकवली पोलीस करत आहेत.










