कोकण रेल्वे प्रवासी समन्वय - संघर्ष समितीतर्फे पालकमंत्र्याचा सत्कार

लवकरच रेल्वेप्रश्नावर बैठक बोलावू : नितेश राणे
Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: November 09, 2025 18:40 PM
views 90  views

सिंधुदुर्गनगरी : कोकण रेल्वेच्या जलद गाड्यासुविधा आणि रेल्वेच्या प्रश्नासाठीरेल्वे मंत्र्यांशी चर्चा झाली असून लवकरच कोकण रेल्वे प्रवासी समन्वय आणि संघर्ष समितीची बैठक आयोजित केली जाईल अशी ग्वाही राज्याचे बंदर विकास उद्योग मंत्री तथा सिंधुदुर्ग चे पालकमंत्री नितेश राणे यांनी दिली.

सिंधुदुर्ग नगरी येथे बाळशास्त्री जांभेकर पत्रकार भवन येथील सभागृहात कोकण रेल्वे प्रवासी समन्वय आणि संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रकाश पावसकर यांच्या हस्ते पालकमंत्री नितेश राणे यांचा सत्कार  करण्यात आला होता यावेळी कणकवली कोकण रेल्वेप्रवासी संघटनेचेअध्यक्ष सुरेश सावंत, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत,सचिव अजय मयेकर ,राजन परब जयेंद्र परब साईनाथ आंबेरकर संजय वालावलकर सुशील निब्रेआदींसह कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी कोकण रेल्वेच्या मार्गावर सिंधुदुर्ग जिल्ह्यात सिंधुदुर्ग आणि कणकवली स्टेशनवर प्रत्येकी दोन याप्रमाणे चार जलद गाड्यांना थांबा मिळणे बाबत पालकमंत्री नितेश राणे यांनी केलेल्या प्रयत्न पद्ध लत्यांचा सत्कार करण्यात आला.

कोकण रेल्वे प्रवासी समन्वय आणि संघर्ष समिती, सिंधुदुर्ग कडून मागील कित्येक महिने पाठपुरावा करत असलेल्या मागण्यांना थोड्या थोड्या  प्रमाणात यश प्राप्त होत आहे. त्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून केंद्रीय रेल्वे मंत्र्यांपर्यंत आपल्या मागण्या लावून धरल्यामुळे सिंधुदुर्ग आणि कणकवली येथे चार रेल्वेना थांबा मिळाला. आहे त्याच्या सहकार्यामुळे  आपल्याला हे यश मिळाले त्याबरोबर मागील निवेदनाप्रमाणे काही उर्वरित मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

यामध्ये खारेपाटण, वैभववाडी ते मडूरास्टेशनवर जलद गाड्यांच्या मागणीनुसार थांबे मिळावेत वैभववाडी नांदगाव येथे पी आर एस तिकीट काउंटर सुरू करा कोकण कन्या या जलद गाडीला नियमित होणारी गर्दी लक्षात घेता सदरची गाडी सुटण्या आदी सीएसटी ते मडगाव अशी स्वतंत्र रेल्वे गाडी सुरू करावी महाराष्ट्राचे शेवटचे टोक असलेले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मडुरा रेल्वे स्टेशनच्या आजूबाजूच्या रेल्वे जंक्शनसाठी घेतलेली जागापडून नसून येथील अनेक प्रकल्पग्रस्तांच्या जमिनी गेल्या आहेत रेल्वे बोर्डानेआणि रेल्वेमंत्र्यांनी अडोरा रेल्वे स्टेशन येथे जंक्शन करावे सिंधुदुर्गातील चार रेल्वे स्टेशनच्या सुशोभीकरणाप्रमाणे वैभववाडी सह अन्य रेल्वे स्टेशनचे सुशोभीकरण काम हाती घ्यावे वैभववाडी कोल्हापूर, सावंतवाडी कोल्हापूर हे नव्याने रेल्वे मार्ग हाती घ्यावेत तसेच कोकण रेल्वेचे रोहा आपटा पर्यंत झालेले दुपदरीकरण सिंधुदुर्ग जिल्ह्यात बोगदे विरहित रेल्वे मार्ग असल्यामुळे सिंधुदुर्गातील रेल्वे मार्गाचे दुपदरीकरणकाम मंजूर करावे रेल्वे स्टेशनचे सुशोभीकरण प्लॅटफॉर्म वरील सुविधा मिळाव्यात यासह जिल्ह्यातील १६जलद गाड्यांना थांबा न मिळणाऱ्या चार गाड्यांना आपल्या प्रयत्नाने थांबे प्राप्त झाले उर्वरित बारा गाड्यांपैकी वैभववाडी नांदगाव ,मडूरा ,खारेपाटण सह स्टेशनवर जलद गाड्यांना थांबे मिळावेत नांदगाव ,झाराप स्टेशनवर मांडवी कोकण कन्या या गाड्यांना थांबे मिळावेतअशा विविध मागण्यांचे निवेदन पालकमंत्री नितेश राणे यांना देत या प्रश्नांबाबत लवकरच आपल्या समवेत बैठक आयोजित करावी अशी मागणी केली.