
कणकवली : साळीस्ते येथील एका हॉटेलमध्ये काम करत असलेले संजय गणपत खापरे (वय ४७, रा. संगमेश्वर - रत्नागिरी) हे शुक्रवारी सकाळी १० वा. सुमारास कासार्डे - आनंदनगर येथील एका हॉटेल नजीक मयत स्थितीत आढळून आले. संजय हे विजय सावंत (रा. भिरवंडे) यांच्या साळीस्ते येथील हॉटेलमध्ये वर्षभरापासून कामाला होते. त्यांना दारूचेही व्यसन होते. घटनेबाबत विजय सावंत यांनी दिलेल्या खबरीनुसार कणकवली पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.










