
कणकवली : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या सिंधुदुर्गचे विभाग नियंत्रक दिपक घोडे यांनी पालकमंत्री तथा बंदर विकास व मत्स्य व्यवसाय मंत्रीनितेश राणे यांची नुकतीच भेट घेतली. जनतेला एसटीच्या सक्षम सुविधा पुरवा, अशा सूचना नितेश राणे यांनी दिल्या. श्री. घोडे यांनी यापूर्वी विविध विभागांत उल्लेखनीय सेवा बजावली आहे. या अनुभवाचा फायदा सिंधुदुर्गला व्हावा अशी अपेक्षा राणी राणी घोडे यांच्याकडून व्यक्त केली.










