नंदु तिरोडकर यांचं निधन

Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: November 04, 2025 12:27 PM
views 67  views

कणकवली : तालुक्यातील कोंडये येथील रहिवासी नंदकिशोर उर्फ नंदू वसंत तिरोडकर (६८) यांचे रविवारी २ नोव्हेंबर रोजी अल्पशा आजाराने मुंबई येथे निधन झाले. गेले काही दिवस त्यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांच्यावर मुंबई येथे उपचार सुरू होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन विवाहित मुली, नातवंडे, भाऊ, भावजय असा मोठा परिवार आहे. कोंडये येथील सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक उपक्रमात त्यांचा नेहमी हिरहिरीने सहभाग असे. कृषी विषयक कामात त्यांना विशेष आवड होती. मनमिळावू स्वभावामुळे त्यांचा मोठा मित्रपरिवार होता. त्यांच्यावर कोंडये येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.