
कणकवली : हरकुळ बुद्रुक येथील रहिवाशी व रिक्षा व्यावसायिक सुभाष गंगाराम शिरसाट (५८) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. सिंधुदुर्गातील वारकऱ्यांची पायीवारी सुरु झाल्यापासून सुभाष हे नियमित वारी करायचे. त्यांच्या पश्चात भाऊ, बहीण, भावजया, पुतणे, पुतण्या, सुना, नातवंडे, भाचा असा परिवार आहे. कोटेश्वर महा-ई-सेवा केंद्राचे मालक गणेश पारकर यांचे ते मामा होत.










