ठाकरे शिवसेना आयोजित गडकिल्ले - रांगोळी स्पर्धेचा निकाल जाहीर

Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: October 27, 2025 13:18 PM
views 34  views

कणकवली : शिवसेना उबाठा पक्षाच्या कलमठ विभागातर्फे कलमठ गाव मर्यादित गडकिल्ल्यांची प्रतिकृती उभारणे व रांगोळी स्पर्धा आयोजित केली होती. यात गडकिल्ल्यांची प्रतिकृती उभारणे स्पर्धेत कलमठ सुतारवाडी येथील मयुरिशा दत्तात्रय पारकर, स्वरांश संतोष रेवंडकर या जोडीला प्रथम क्रमांक पटकाविला. रांगोळी स्पर्धेत कुंभारवाडी येथील किमया हिंदेळकर हिने प्रथम क्रमांक पटकाविला.

दोन्ही स्पर्धांचा सविस्तर निकाल  खालीलप्रमाणे 

गडकिल्ल्यांची प्रतिकृती तयार करणे स्पर्धा : द्वितीय कुणाल मिलिंद मेस्त्री (बिडीयेवाडी), तृतीय-पिंपळपार मित्रमंडळ,कलमठ (सुतारवाडी), उत्तेजनार्थ-नील संदीप पाटकर (लांजेवाडी),  ओंकार मित्रमंडळ,(बाजारपेठ कलमठ) यांनी पटकाविला.  विजेत्यांना तोरणागड, प्रतापगड, सिंधुदुर्ग किल्ला, मुरुड-जंजिरा किल्ला यासह अन्य किल्ले तयार केले होते. रांगोळी स्पर्धा : द्वितीय - वेदांत विद्याधर चिंदरकर (कुंभारवाडी), तृतीय - वैदेही धुत्रे (कलमठ-बाजारपेठ), उत्तेजनार्थ - तन्वी चव्हाण (लांजेवाडी) यांनी क्रमांक पटकाविले. या स्पर्धेचे परीक्षण नंदकुमार हजारे, प्रवीण चिंदरकर, राहुल कांबळी यांनी केले. 

दोन्ही स्पर्धांचे बक्षीस वितरण विठ्ठल रखुमाई मंदिरात पार पडले. विजेत्यांना शिवसेना उबाठा पक्षाच्या युवासेनेचे जिल्हाप्रमुख सुशांत नाईक व अन्य मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. सहभागी स्पर्धकांना स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी माजी सरपंच धनश्री मेस्त्री, विजय उर्फ नाना कांबळी, महादेव उर्फ बाबा ढवण, अशोक लाड, विलास गुडेकर, विनायक उर्फ बाबू मेस्त्री, नंदकुमार हजारे, जितेंद्र उर्फ जितू कांबळे, अर्चना कोरगावकर, सुंदर उर्फ गोट्या कोरगावकर, नितेश भोगले, ग्रा. पं. सदस्य धीरज मेस्त्री, नितीन पेडणेकर, प्रवीण चिंदरकर, अक्षय कोरगावकर, श्रीनाथ ढवण, प्रसाद मठकर, निश्चय हुन्नरे आदी उपस्थित होते.

या स्पर्धा यशस्वी होण्यासाठी युवासेनेचे कलमठ शहरप्रमुख धीरज मेस्त्री, युवासेना तालुका संघटक नितेश भोगले, प्रसाद मठकर, नितीन पेडणेकर, अक्षय कोरगावकर, निश्चय हुन्नरे, सिद्धेश हुन्नरे, श्रीनाथ ढवण, नील लोकरे यांनी मेहनत घेतली.