
कणकवली : मुळ कणकवली तालुक्यातील वरवडे - बौद्धवाडी येथील व सध्या वडाळा - मुंबई येथे वास्तव्यास असलेल्या मनीषा बापू वरवडेकर (६२) यांचे बुधवार, ८ ऑक्टोबरला मुंबई येथेच उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुलगे, दोन मुली, सून, जावई, नातू असा परिवार आहे. मनीषा या मनमिळावू स्वभावासाठी परिचित होत्या. त्यांचे दिवस कार्य रविवार, १९ ऑक्टोबरला शिवडी (पूर्व) - मुंबई येथे होणार आहे.










