
कणकवली : कणकवली शहर भाजप पुरस्कृत व समीर नलावडे मित्रमंडळाच्यावतीने शहरातील पेट्रोल पंपासमोरील उड्डाणपुलाखाली १९ ऑक्टोंबर पर्यंत दिवाळी बाजार भरविण्यात आला आहे. याचे उद्घाटन बुधवारी सायंकाळी बुधवारी सायंकाळी ज्येष्ठ नागरिक सेवा संपाचे जिल्हाध्यक्ष राजस रेगे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, अर्जुन राणे, किशोर राणे, अण्णा कोदे, मेघा गांगण, सुप्रिया नलावडे, चारु साटम, संजय कामतेकर, विराज भोसले, प्रद्युम मुंज, निथी निखार्गे, सुनील नाडकर्णी, लवू पिळणकर, परेश परब, मनोहर पालयेकर, राजन भोसले, सखाराम सकपाळ, भालचंद्र मराठे, संजीवनी पवार, भारती पाटील, स्मिता कामत, प्रिया सरूडकर, क्रांती लाड, संजीवनी आदींसह अनेक मान्यवर आणि नागरिक उपस्थित होते.
या दिवाळी बाजारमध्ये ग्राहकांना विविध वस्तू व पदार्थाच्या खरेदीसाठी एकूण ४० स्टॉल्स लावण्यात आले आहेत. घरगुती बनविलेले चविष्ट फराळाचे साहित्य, आकर्षक आकाश कंदील, सुबक मातीच्या पणत्या यासह दिवाळीसाठी लागणा या अन्य अनेक वस्तू या बाजारात उपलब्ध आहेत. गतवर्षी या दिवाळी वाजारमध्ये लाखो रुपयांची उलाढाल झाली होती.
यावरून नागरिकांचा या बाजारला दरवर्षी चांगला प्रतिसाद मिळतो हे दिसून येते. नागरिकांनी या संधीचा लाभ घेऊन घरगुती व दर्जेदार वस्तू खरेदी कराव्यात, असे आवाहन आयोजकांनी केले. कणकवली शहरातील नागरिकांना दिवाळीसाठी आवश्यक असलेल्या सर्व वस्तू एकाच ठिकाणी उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने समीर नलावडे मित्रमंडळाच्यावतीने गेली ८ वर्षे दिवाळी बाजार या संकल्पनेला राबविली जात आहे.