
कणकवली : आशिये - वरचीवाडी येथील नुपूर विठ्ठल देवळी (१८) ही महाविद्यालयीन मुलगी शनिवार ११ ऑक्टोबर रोजी सकाळी ७.३० वाजल्यापासून राहत्या घरातून बेपत्ता झाली आहे. याबाबतची खबर तिचे वडील विठ्ठल देवळी यांनी कणकवली पोलीस ठाण्यात दिली. नुपूर ही कॉलेजला जाते, असे सांगून घरातून बाहेर पडली ती अद्याप घरी आलेली नाही. तिची उंची ५ फुट ४ इंच, रंग गोरा अंगाने सडपातळ, केस लांब, डोळे काळे, नाक सरळ, गळ्यात चांदीची चेन, अंगात मोती कलरचा टॉप व काळ्या रंगाची लेगीज आहे. अशा वर्णनाची युती सापडल्यास संपर्क साधावा, असे आवाहन कणकवली पोलिसांनी केले आहे.










