कोकण रेल्वे कर्मचाऱ्याची बिल्डिंगखाली पार्क केलेली दुचाकी चोरीस

Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: October 12, 2025 18:53 PM
views 453  views

कणकवली : कणकवली शहरात शिवाजीनगर येथे इमारतीखाली उभी करून ठेवलेली टिव्हीएस कंपनीची एंटॉर्क दुचाकी चोरीस गेल्याची घटना रविवारी उघडकीस आली. कोकण रेल्वे कर्मचारी अनिल तुकाराम तांबे ( वय ५६) हे माऊली दर्शन अपार्टमेंट शिवाजीनगर , कणकवली येथे राहतात. शनिवारी सायंकाळी ७ वाजता तांबे यांनी आपली दुचाकी इमारतीखाली पार्क केली. रविवारी सकाळी १० वाजता गाडी पार्क केलेल्या ठिकाणी आढळून आली नाही. . शोधाशोध करूनही गाडी सापडून आली नाही. त्यामुळे अनिल तांबे यांनी आपली दुचाकी चोरीस गेल्याची कणकवली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.