
कणकवली : कलमठ - नाडकर्णीनगर येथील रहिवासी आणि वैष्णवी ट्रॅव्हल्स कणकवलीचे मालक मनोज जाधव यांचे वडील रामचंद्र देवाप्पा जाधव उर्फ आर. डी. जाधव गुरुजी (८३) यांचे गुरुवारी वार्धक्याने निधन झाले. राजापूर तालुक्यातील तारळ येथे त्यांनी शिक्षक म्हणून दीर्घकाळ कार्य केले. विद्यार्थीप्रिय, प्रामाणिक आणि आदर्श शिक्षक म्हणून त्यांची ओळख सर्वत्र होती. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, विवाहित मुलगी आणि नातवंडे असा परिवार आहे.










