
कणकवली : महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाकडून कणकवली विभागासाठी मोबाईल मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन उपलब्ध झाली. मोबाईल व्हॅन व हॅन हाताळणारी टीम देखील कणकवली पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन हे एक फिरते डिजिटल फॉरेन्सिक लॅब वाहन आहे, जे गुन्हेगारीच्या ठिकाणी जलद आणि प्रभावीपणे डिजिटल पुरावे गोळा करण्यासाठी आणि त्याचे विश्लेषण करण्यासाठी वापरले जाते. ज्यामुळे तपास यंत्रणांची कार्यक्षमता वाढते आणि गुन्हे सोडवण्यास मदत होते. विशेष म्हणजे हे तंत्रज्ञान सुरू करणारे महाराष्ट्र हे भारतातील पहिले राज्य ठरले आहे.










