
कणकवली : कणकवली शहरातील मधलीवाडी येथील ओंकार मित्रमंडळातर्फे नवरात्र उत्सवानिमित्त रविवार २८ सप्टेंबरला सत्यनारायण महापूजा व दशावतार नाटकाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १० वाजता श्री सत्यनारायण महापूजा होणार आहे. रात्री ८ वाजता श्री. विठ्ठलादेवी दशावतार नाट्य मंडळ, राठीवडे-सुतारवाडी यांचे 'असुर मर्दिनी चामुंडा देवी' हे पौराणिक नाट्य सादर करणार आहेत. भाविक, ग्रामस्थ आणि नाट्यप्रेमी रसिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.










