
कणकवली : दिगंत स्वराज फाउंडेशनतर्फे जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये वह्यावाटप करण्यात आले. कै.गीता शिवराम दिवटे यांच्या स्मरणार्थ हा उपक्रम राबविण्यात आला. हिर्लोक शाळेत २५६ विद्यार्थ्यांना संस्थेचे सचिव दीपक नारकर सर यांच्या उपस्थितीत वह्यावाटप करण्यात आले. जांभवडे येथील शिवाजी हायस्कूलमध्ये ३४२, नरडवे येथील न्यू इंग्लिश स्कूलमधील ९८, नाटळ शाळेतील १५४ विद्यार्थ्यांना वह्यावाटप करण्यात आले. हिवाळे येथील प्राथमिक शाळेतील १८, दिगवळे येथील १८, भरणी येथील १० विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले. उपक्रमाला किशोर तेली यांचे मार्गदर्शन आणि फाउंडेशनचे संचालक राहुल तिवरेकर यांचे सहकार्य लाभले.










