
कणकवली : कणकवली कॉलेजमधील कर्मचारी संजय राणे यांना मुंबई विद्यापीठाचा सर्वोत्कृष्ट शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला. संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
कणकवली कॉलेजमध्ये संजय राणे गेली अनेक वर्षे कार्यालयीन सेवा बजावत आहेत. नियमित कार्यालयीन कामकाजासोबतच त्यांनी महाविद्यालयाच्या विविध सांस्कृतिक, सामाजिक उपक्रमांमध्येही हिरीरीने सहभाग घेतला आहे. त्यांच्या या कामगिरीबद्दल सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षातील ग्रामीण भागासाठी असणारा सर्वोत्कृष्ट शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. स्मृतीचिन्ह, रोख रक्कम आणि प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्कार वितरण कार्यक्रमावेळी मुंबई विद्यापिठाचे कुलगुरू डॉ.रवींद्र कुलकर्णी, डॉ.अजय भामरे, कुलसचिव डॉ.प्रसाद कारंडे आदी मान्यवर उपस्थित होते.










