
कणकवली : होमिओपॅथिक रिसर्च व डेव्हलपमेंट फाउंडेशनच्यावतीने तांबे एज्युकेशन सोसायटी मुंबई संचालित राजर्षी छत्रपती शाहू महाराज गतिमंद निवासी विद्यालय करंजे येथे गतिमंद, दिव्यांग मुलांसाठी गुरुवार २५ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते दुपारी २ यावेळेत मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे करण्यात आले आहे. यात डॉ. कविता सावंत, डॉ. दीपाली गुप्ते, डॉ. अबिदा परब, डॉ. मयुर गोसावी, डॉ. भैरवी गोसावी हे तज्ज्ञ डॉक्टर तपासणी करणार आहेत. अधिक माहितीसाठी मुख्याध्यापक रश्मी सोगम यांच्याकडे साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.










