
कणकवली : केंद्र शासनाने नुकताच पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी (पीएम-स्वनिधी) या योजनेचा कर्ज कालावधी ३१ मार्च २०३० पर्यंत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शहरातील फेरीवाले, लघुउद्योजक व कुटुंबांना योजनेचा लाभ घेता येणार आहे. कणकवली शहरातील फेरीवाल्यांनी शासनाच्या या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कणकवली नगरपंचायतीचे मुख्याधिकारी गौरी पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
केंद्र शासनाकडून या योजनेत सुधारणा करून पहिल्या टप्प्यातील कर्ज मयार्दा दहा हजार रु. वरून पंधरा हजार रुपये, दुसºया टप्प्यातील कर्ज मयार्दा वीस हजार रु. वरून पंचवीस हजार रुपये इतकी वाढविण्यात आली आहे. तर तिसºया टप्प्यातील कर्ज मयार्दा पन्नास हजार रुपये आहे. याशिवाय, वेळेवर हप्ता परत करणाºया फेरीवाल्यांना यूपीआय लिंक्ड रुपे क्रेडिट कार्ड उपलब्ध होणार असून त्याद्वारे अचानक उद्भवणाºया व्यवसाय व वैयक्तिक गरजांसाठी आर्थिक मदत मिळू शकेल. योजनेअंतर्गत फेरीवाल्यांना डिजिटल व्यवहारांवर एक हजार ६०० रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळणार आहे. ही योजना अधिक गतिमान पद्धतीने राबविण्यासाठी शासनाकडून १७ सप्टेंबर ते २ आॅक्टोबरपर्यंत जन कल्याण मेळावा आयोजित करण्यात येणार आहे.










