
कणकवली : शहरातील गणपती सानानजीक असलेल्या चौंडेश्वरी मंदिरात सोमवार २२ सप्टेंबर ते २ आॅक्टोबरपर्यंत नवरात्रोत्सव साजर होणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम पार पडणार आहेत. सोमवार २२ सकाळी ९.३० वा. घटस्थापना होईल. त्यानंतर विजयादशमीपर्यंत रोज संध्याकाळी ७.३०आरती होईल. अष्टमीच्या दिवशी देवीचा गोंधळ होणार आहेत. या उत्सवात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा कोष्टी समाज सेवा संघातर्फे करण्यात आले आहे.










