
कणकवली : वागदे येथील गोपुरी आश्रमाच्यावतीने शनिवार २७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४.३० वा. आश्रमाच्या कै. गणपतराव सावंत सभागृहात 'मराठी भाषा आणि मराठी शाळांचे भवितव्य' या विषयावर डॉ. दीपक पवार व डॉ. प्रकाश परब यांचे व्याख्यान आयोजित केले आहे. हे व्याख्यान ऐकण्यासाठी सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन गोपुरी आश्रमाचे अध्यक्ष प्रा. राजेंद्र मुंबरकर व सचिन विनायक उर्फ बाळू मेस्त्री यांनी केले आहे.










