
कणकवली : रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाचे औचित्त साधून आडवली मालडी (ता. मालवण ) मंडल भाजपाच्या वतीने नैसर्गिक आपत्तीने वडाचे झाड पडून पाण्याच्या टाकीचे नुकसान झालेल्या जि.प.प्राथ.शाळा असरोंडी नं.2 उत्तरविभाग शाळेला पाण्याची नविन टाकी देवून रविद्र चव्हाण यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
यावेळी जिल्हा परिषद सिंधुदुर्गचे माजी बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण, मालवण पंचायत समितीचे माजी उपसभापती राजू परूळेकर, माजी उपसभापती अरूण मेस्त्री, असरोंडीचे माजी सरपंच छोटू घाडीगांवकर, माजी सरपंच संतोष महाजन, सुवर्ण महोत्सव कमिटीचे अध्यक्ष अनिल सावंत, उत्तरविभाग मुंबई मंडळाचे विजय सावंत, प्रभाकर सावंत, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष देवयानी घाडीगावकर, सदस्य भिवा घाडीगांवकर, प्रेरणा सावंत, जयश्री शिंगाडे, भावी घाडीगांवकर, विद्या सावंत, सदस्य सुनील असरोंडकर, देवू गावकर, अनिल घाडीगावकर, अनिषा पोईपकर, समृद्धी महाजन, मुख्याध्यापक देवेंद्र राणे, शिक्षिका गीताताई भरडकर व विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांना खावू वाटप करण्यात आले. यावेळी आडवली - मालडी दशक्रोशीतील सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.










