
कणकवली : कणकवली बसस्थानकातून नियमित दुपारी व सायंकाळी सुटणारी सुटणारी कणकवली-कुंभवडे ही बस गेले काही दिवस वेळेत सुटत नाही. अनियमित सुटणाºया बसफेºयांमुळे नागरिकांसह विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. त्यामुळे या बसेस वेळेत सोडण्यात याव्यात, तसे न झाल्यास विद्यार्थ्यांना घेऊन एसटी कार्यालयासमोर आंदोलन करू, असा इशारा शिवसेना उबाठा पक्षाच्या युवासेनेच्या शिष्टमंडळाने एसटी महामंडळाच्या विभागीय अधिकाºयांना निवेदनाद्वारे दिला आहे.
कणकवली बसस्थानकातून काही दिवस दुपारी १२.१५ वा. कणकवली -कुंभवडे एसटी बस कुंभवडेत २.३० वाजता येते. तसेच सायंकाळी ५.४५ची कणकवली कुंभवडे रात्री ८.३० वाजता कुंभवडे गावात येते. यामध्ये सकाळी सुटणाºया कणकवली-कुंभवडे बसमध्ये शाळेतील मुले असतात. तसेच सायंकाळी ५.४५ वा सुटणाºया कुंभवडे बसमध्ये कॉलेजची मुले असतात. वेळेत बस न सुटल्यामुळे मुलांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. गावातील नागरिकांना यामुळे कणकवली वरून ये-जा करण्यासाठी विलंब होत आहे. त्यामुळे सकाळी व सायंकाळी कणकवली वरून सुटणारी कुंभवडे बस ही वेळेत सोडावी. या समस्येबाबत युवासेनेच्या शिष्टमंडळाने एसटी महामंडळाच्या विभागीय अधिकाºयांची भेट घेतली. यावेळी विभागीय वाहतूक अधिकारी श्री. देशमुख व सहाय्य्क वाहतूक अधीक्षक श्रीमती कुबडे यांच्याशी चर्चा करण्यात आली. यावेळी युवासेनेचे जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, युवासेना तालुकाप्रमुख तथा एस. टी. कामगारसेना तालुकाध्यक्ष उत्तम लोके. युवासेना तालुका समन्व्यक तेजस राणे, गुरुनाथ पेडणेकर, युवासेना कलमठ शहरप्रमुख धीरज मेस्त्री उपस्थित होते.
अयनिमित बसफेºयांमुळे शाळेतील मुलांची होणारी गैरसोय दूर करावी. दारिस्ते एसटी चालू करण्याची करावी. येत्या १५ दिवसांत आमच्या मागण्या पूर्ण न झाल्यास आम्ही शाळेतील मुलांना घेऊन एस. टी कार्यालयासमोर आंदोलन करू, असा इशारा युवासेनेच्या शिष्टमंडळाने दिला.