वाघेरी सरपंच अनुजा राणेंसह कित्येकांचा भाजपमध्ये प्रवेश

पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत केला प्रवेश
Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: July 21, 2025 13:15 PM
views 339  views

कणकवली : तालुक्यातील वाघेरी गावातील उबाठा व युवासेनेचे विविध पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. यामध्ये उबाठाच्या कार्यकर्त्या व गावच्या सरपंच सौ. अनुजा राणे यांचा समावेश असून, उपसरपंच व इतर पदाधिकारीही भाजपमध्ये सहभागी झाले आहेत. हा प्रवेश कार्यक्रम पालकमंत्री नीतेश राणे यांच्या उपस्थितीत ओमगणेश निवासस्थानी झाला. 

यावेळी उपसरपंच स्नेहल नेवगे, सदस्य निधी राणे, युवासेना उपतालुका प्रमुख व माजी ग्रामपंचायत सदस्य प्रकाश वाघेरकर, माजी सदस्य मंगेश नेवगे, जयश्री वाघेरकर, संचालक गोपाळ कदम, तसेच निलेश वाघेरकर, राजेश कदम, रामदास कदम, एकनाथ वाघेरकर, दिनेश पेडणेकर, सुरेश कदम, साई नेवगे, संजय कदम, सिद्धेश कदम, संकेश कदम, मुकेश कदम, प्रवीण गुरव, सिद्धेश मोंडकर, अक्षय कदम, अमित पेडणेकर, सुलोचना वाघेरकर, चैताली कदम, शीतल कदम, दिव्या पेडणेकर, चैत्राली कदम, चित्रांगी कदम व सुवर्णा कदम यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी भाजपचे विधानसभा प्रमुख मनोज रावराणे, तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, दिलीप तळेकर, पंढरी वायंगणकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.