चोरीच्या तपासासाठी कणकवली पोलीस पुण्याला

पुण्यातील चोरट्यांचा केला जाणार तपास | पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांची माहिती
Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: July 18, 2025 20:30 PM
views 30  views

कणकवली : पुणे येथील चोरी प्रकरणात तेथील पोलिसांनी काही चोरट्यांना अटक केली आहे. कणकवली शहरात ज्वेलर्सचे दुकान फोडीची घटना घडली आहे. या घटनेतील संशयित चोरटे पुणे पोलिसांनी अटक केलेल्या चोरट्यांपैकी असावेत असा पोलिसांचा अंदाज आहे. त्याच अनुषांने कणकवली पोलिसांचे पथक पुण्याला रवाना झाल्याची माहिती पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांनी दिली.

कणकवली शहरातील बाजारपेठ येथील सना कॉम्प्लेक्समधील मंगेश तळगावकर यांचे भालचंद्र ज्वेलर्सचे दुकान बुधवारी पहाटे चोरट्यांनी फोडून १२ लाखांचे सोन्या-चांदीचे दानिने लंपास केले. या चोरीप्रकरणाचा कणकवली पोलिसांकडून तपास सुरू आहे. पोलिसांनी गुरुवारी जिल्ह्यातील सीसीटीव्ही तपासले आहे. भरारी पथकेही नेमली आहेत. पुणे येथील चोरी प्रकरणात पोलिसांनी काही चोरट्यांना अटक केली आहे. पुणे पोलिसांनी अटक केलेल्या चोरटे हे कणकवली शहरातील ज्वेलर्स दुकान फोडीतील आहेत का? या अनुषांने तपास करण्यासाठी कणकवलीचे पोलिसांचे पुण्याला रवाना झाले आहे.