कणकवलीत उबाठा सेनेला धक्का

सरपंच मिलिंद सर्पे यांचा कार्यकर्त्यांसमवेत भाजपात प्रवेश
Edited by:
Published on: July 06, 2025 15:54 PM
views 163  views

कणकवली : तालुक्यातील कसवण गावचे सरपंच मिलिंद सर्पे व अन्य सहकाऱ्यांनी मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या विकास कामांवर प्रभावित होवून गावच्या विकासासाठी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. हा प्रवेश म्हणजे उद्धव सेनेला एक प्रकारचा धक्काच मानला जात आहे. कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी नितेश राणे यांच्या उपस्थितीत प्रवेशकर्त्यांनी भारतीय जनता पार्टी पक्षात प्रवेश केला. नितेश राणे यांनी प्रवेशकर्त्यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. 

प्रवेशकर्त्यांमध्ये कसवण सरपंच मिलिंद सर्पे, शरद सर्पे, तुषार सर्पे, आयुष साळसकर, दशरथ सर्पे, अभिमन्यू सर्पे, पद्माकर सर्पे, प्रकाश कासले, राजाराम सर्पे, पुंडलिक सर्पे, सिद्धार्थ कांबळे, आकाश सर्पे आदींनी प्रवेश केला. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत, तालुकाध्यक्ष  मिलिंद मेस्त्री, कळसुली सरपंच सचिन परधीये, अनिल सावंत, मंगेश तळगावकर आदी उपस्थित होते.