कृषी दिनानिमित्त कणकवली पत्रकार संघातर्फे फोंडाघाटात वृक्षारोपण

Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: June 29, 2025 18:05 PM
views 53  views

कणकवली : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा हरितक्रांतिचे जनक वसंतराव नाईक यांची जयंती व कृषी दिनानिमित्त कणकवली तालुका पत्रकार संघाच्यावतीने मंगळवार १ जुलै रोजी सकाळी १०.३० वा. न्यू इंग्लिश हायस्कूल, फोंडाघाट येथे वृक्षारोपणाचा उपक्रम आयोजित केला आहे. 

या उपक्रमाला शिवसेनेचे उपनेते तथा फोंडाघाट एज्युकेशन सोसायटी संस्थेचे संचालक संजय आग्रे, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोसरकर, मराठी पत्रकार परिषदेचे प्रतिनिधी गणेश जेठे, सचिव बाळ खपडकर, तालुका कृषी अधिकारी प्रवीण ओहोळ, फोंडाघाट सरपंच संजना आग्रे, फोंडाघाट एज्युकेशन सोसायटी संस्थेचे चेअरमन राजू पटेल, सचिव शेखर लिंग्रज, मुख्याध्याक प्रकाश पारकर, कणकवली वनविभागाचे क्षेत्रपाल सुहास पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी या उपक्रमाला पत्रकार संघाच्या सर्व सदस्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन अध्यक्ष भगवान लोके, सचिव संजय सावंत, खजिनदार रोशन तांबे आणि कार्यकारिणीने केले आहे.