मंत्री गोगावले यांनी घेतले देव पाचोबाचं दर्शन

Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: June 29, 2025 11:17 AM
views 282  views

कणकवली : महाराष्ट्र राज्याचे फलोत्पादन रोजगार हमी योजना व खारभुमी विकासमंत्री भरतशेठ गोगावले यांनी नुकतीच डामरे येथील पवित्र पाचोबा देवस्थान येथे भेट देत, दर्शन घेतले. याप्रसंगी शिवसेना उपनेते संजय आंग्रे यांची विशेष उपस्थिती होती. 

यावेळी शिवसेना कणकवली विधानसभाप्रमुख संदेश पटेल, मंगेश गुरव, फोंडाघाट ग्रामपंचायत सदस्य पवन भोगले, तसेच पाचोबा मित्रमंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. देवाच्या चरणी सर्व जनतेच्या कल्याण, आरोग्य व समृद्धीसाठी प्रार्थना करण्यात आली. मंत्रीमहोदयांच्या या भेटीमुळे परिसरात भक्तिभाव आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.