SOF ऑलिंपियाड मॅथ्स परीक्षेत चैतन्य दळवीचं यश

Edited by: साहिल बागवे
Published on: June 27, 2025 15:09 PM
views 116  views

कणकवली : SOF फॉउंडेशन मार्फत घेण्यात आलेल्या इंटरनॅशनल मॅथ्स ऑलिंपियाड परीक्षेत ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज वरवडे चा विध्यार्थी कु. चैतन्य श्रीकांत दळवी (इयत्ता दहावी) याने झोन महाराष्ट्र 2 या झोनल विभागात 495 वा रँक मिळवत आयडियल इंग्लिश स्कूल वरवडे प्रशालेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. या यशाबद्दल नुकतेच कु. चैतन्य श्रीकांत दळवी यांस प्रशालेत गौरविण्यात आले.

या यशाबद्दल ज्ञानदा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. विद्याधर तायशेटे, उपाध्यक्ष श्री. मोहन सावंत, कार्याध्यक्ष श्री. बुलंद पटेल, संस्थापक सचिव प्राध्यापक हरिभाऊ भिसे सर , सहसचिव प्राध्यापक निलेश महिंद्रकर सर, खजिनदार सौ. शीतल सावंत मॅडम, सल्लागार श्री. डी. पी. तानावडे सर, मुख्याध्यपिका सौ. अर्चना शेखर देसाई, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.