LIVE UPDATES

दोन दुचाकींच्या अपघातांमधील दुसऱ्या दुचाकीस्वाराचाही मृत्यू

कणकवली - कनेडी मार्गावर सांगवेत झाला होता अपघात
Edited by: स्‍वप्‍निल वरवडेकर
Published on: June 26, 2025 19:08 PM
views 452  views

कणकवली : कणकवली - कनेडी मार्गावरील सांगली येथे बुधवारी सायंकाळी दोन दुचाकींची समोरासमोर धडक बसून अपघात झाला होता. या अपघातात एकजण जागीच मृत्यूमुखी पडला होता. तर गंभीर जखमी असलेला चिन्मय सुनील शिरसाट (23, नाटळ -पांगवाडी) याचा गुरुवारी सकाळी 10:45 वा सुमारास गोवा - बांबोळी येथील रुग्णालयात उपचार दरम्यान मृत्यू झाला.

हा अपघात बुधवारी सायंकाळी ६.२० वा सुमारास घडला होता. चिन्मय शिरसाट हा आपल्या ताब्यातील टीव्हीएस दुचाकीने कनेडीच्या दिशेने जात होता तर अनंत घाडी हा आपल्या ताब्यातील हिरो कंपनीच्या दुचाकीने कणकवलीच्या दिशेने येत होता. सांगवे येथील गायत्री थांब्यानजीक दोन दुचाकींची समोरासमोर धडक बसली होती. अपघातात अनंत हा जागीच मृत्यूमुखी पडला होता. तर गंभीर जखमी चिन्मय याला सुरुवातीला उपजिल्हा रुग्णालय, तेथून कणकवलीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पुढे अधिक उपचार साठी त्याला गोवा - बांबोळी येथे नेण्यात आले होते. तेथेच उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला अपघाताची खबर अनंत घाडी याचा सहकारी नागेश अशोक रजपूत (29, कलमठ - सुतारवाडी, मूळ रा. बेळगाव) याने  दिली. त्यानुसार हयगयीने, अविचाराने वाहन चालवून स्वतःच्या व दुसऱ्या दुचाकीस्वाराच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी मयत चिन्मय शिरसाट याच्यावर कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे