
कणकवली : विद्यार्थ्यांनी व्यसनांपासून दूर राहिले पाहिजे. व्यसनमुक्तीच्या कार्यात विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन समाज व्यक्तमुक्तीसाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांनी केले.
नशामुक्ती भारत अभियानअंतर्गत येथील विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित केला होता. याप्रसंगी श्री. जाधव बोलत होते. यावेळी पोलीस उपनिरीक्षक पवन कांबळे, वृषाली बरगे, पोलीस हवालदार पांडुरंग पांढरे, विनया सावंत, पोलीस कॉन्स्टेबल स्वप्नाली कांबळे, नशाबंदी मंडळाच्या सिंधुदुर्गच्या संघटक अर्पिता मुंबरकर, शिक्षक अच्युत वणवे, प्रसाद राणे, विलास ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते.
अर्पिता मुंबईकर यांनी नशेची कारणे नशेचे दुष्परिणाम आणि त्यावरील उपाययोजना यावर मार्गदर्शन केले. अतुल जाधव यांनी व्यसनांपासून दूर राहण्याचे आवाहन केले. अच्युत वनवे यांनी मार्गदर्शन केले. मान्यवरांचे स्वागत अच्युत वणवे यांनी केले. सूत्रसंचालन विलास ठाकूर यांनी केले. आभार प्रसाद राणे यांनी मानले. यावेळी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.