स्पर्धेत टिकण्यासाठी सर्वंकष ज्ञान आत्मसात करा

राजेश सापळे यांचे विद्यार्थ्यांना आवाहन : वैश्य समाजातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव
Edited by: स्‍वप्‍निल वरवडेकर
Published on: June 26, 2025 18:23 PM
views 47  views

कणकवली : सध्याचे युग स्पर्धेचे आहे. स्पर्धात्मक टिकण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याने सर्वकष ज्ञान आत्मसात केले पाहिजे. ध्येयपूर्तीसाठी विद्यार्थ्यांनी जिद्द बाळगली पाहिजे. वैश्य समाजातील विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण स्वत:चे, कुटुंबाचे आणि समाजात नाव रोशन केले पाहिजे. त्यामुळे शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळावावे. कणकवली तालुका वैश्य समाजातर्फे समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्याचा उपक्रम स्तुत्य आहे, असे प्रतिपादन उद्योजक राजेश सापळे यांनी केले.

कणकवली वैश्य समाजातर्फे प.पू. भालचंद्र महाराज संस्थान येथील सभागृहात आयोजित केलेल्या समाजातील गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यात श्री. सापळे  बोलत होते. यावेळी कणकवली वैश्य समाज अध्यक्ष महेंद्र मुरकर, सचिव अ‍ॅड. गुरुनाथ पावसकर, उपाध्यक्ष लबू पिळणकर, खजिनदार विलास कोरगावकर, सल्लागार दादा कुडतरकर, नागेश मोरये कार्यकारिणी सदस्य राजन पारकर, प्रसाद अंधारी, नाना काणेकर, नीलम घडाम, शीतल सापळे, योजना सापळे, उमेश बाळके, सिंधुदुर्ग जिल्हा गुरु सेवा समितीचे अध्यक्ष अ‍ॅड दीपक अंधारी, विद्यामंदिर प्रशालेचे मुख्याध्यापक पी. जे. कांबळे, करुळ हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. नारकर , विद्या शिरसाट, सुप्रिया तायशेटे, माधवी मुरकर आदी मान्यवर उपस्थित होते.

महेंद्र मुरकर म्हणाले, तुमच्या पाठीवर कौतुकाची थाप देणे हे समाजाचे कर्तव्य आहे. हे कर्तव्य आपला समाज पार पाडत आहे. त्यामुळे भविष्यात कितीही मोठे झालात तरी समाजाला विसरु नका. योजना सापळे म्हणाल्या मोबाईल वापरणे जेवढे चांगले आहे तेवढचे तो तोट्याचे आहे. मोबाईलचा वापर अभ्यासासाठी, स्पर्धा परीक्षेसाठी करावा, असे आवाहन त्यांनी केले.

पी. जे. कांबळे, अ‍ॅड. गुरुनाथ पावसकर, विष्णू सबसे, दादा कुडतरकर यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना भेटवस्तू देऊन गुणगौरव करण्यात आला. दादा कुडतरकर यांना कोकण विभागीय ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट कार्यकर्ता पुरस्कार मिळाल्याबद्दल समाजातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. आरंभी वैश्य समाजाचे गुरु श्री श्री वामनाश्रम यांच्या प्रतिमेस यांच्या राजेश सापळे यांनी पुष्पहार अर्पण केला. पू. पू. भालचंद्र महाराज यांच्या मूर्ती मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून दीप्रज्वलन केले. प्रास्ताविक महेद्र मुरकर यांनी केले. सूत्रसंचालन श्रीमती  पोकळे यांनी केले. आभार विलास कोरगावकर यांनी मानले. यावेळी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.