
कणकवली : राज्याचे बंदर व मत्स्यविकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नीतेश राणे यांच्यावर वाढदिवसानिमित्त सोमवारी शुभेच्छांचा वर्षाव झाला. सोमवारी दिवसभर कणकवलीतील ओमगणेश निवासस्थानी शुभेच्छा स्विकारून सायंकाळनंतर मुंबईत दाखल झालेल्या राणे यांना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या. तर मंत्री दादा भुसे, मंत्री पंकज भोयर, आमदार दीपक केसरकर, आमदार कालिदास कोळंबकर यांनीही नीतेश राणे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.