कणकवलीत उमेद मार्टचं पालकंत्र्यांच्या हस्ते उ‌द्घाटन

Edited by: स्‍वप्‍निल वरवडेकर
Published on: June 23, 2025 20:42 PM
views 125  views

कणकवली : कणकवली पंचायत समिती येथील महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत उमेद मार्ट या महिला स्वयंसहाय्यता समुह उत्पादनांच्या संकलन व विक्री केंद्राचे उ‌द्घाटन सोमवारी सायंकाळी पालकमंत्री नीतेश राणे यांच्या हस्ते पार पडले. सदर संकलन व विक्री केंद्राची जास्तीतजास्त प्रसिद्धी करा. जेणेकरून विक्रीही वाढेल, अशी सूचना राणे यांनी केली. याप्रसंगी जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर, प्रकल्प संचालक उदय पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी, गटविकास अधिकारी अरूण चव्हाण, विस्तार अधिकारी सूर्यकांत वारंग, कलमठ सरपंच संदीप मेस्त्री आदी तसेच पं. स. चे सर्व कर्मचारी उपस्थित होते. दरम्यान जिल्ह्यातील दोन प्राथमिक आरोग्य केंद्रांना रुणावाहिका मंजूर झाल्या असून त्याचेही लोकार्पण यावेळी करण्यात आले.