आरेतील ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

Edited by:
Published on: June 23, 2025 15:41 PM
views 106  views

कणकवली : शिवसेना ठाकरे सेनेचे पदाधिकारी आरे येथील उद्योजक नितीन विष्णू जेठे व सचिन चव्हाण यांनी पालकमंत्री ना. नितेश राणे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत असतानाच भारतीय जनता पार्टी पक्षात प्रवेश करून सरप्राईज दिले आहे. ना. नितेश राणे यांनी प्रवेशकर्त्यांचे भारतीय जनता पक्षाचे शाल घालून स्वागत केले. यावेळी अमित साटम, संदीप साटम, महेश पाटोळे, सत्यवान पाटोळे, बंटी जेठे, मिलिंद साटम आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.