अबिद नाईकांनी दिल्या नितेश राणेंना शुभेच्छा...!

Edited by:
Published on: June 23, 2025 14:40 PM
views 147  views

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे मत्स्य उद्योग व बंदरे कॅबिनेट मंत्री व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवली येथील ओम गणेश या त्यांच्या निवासस्थानी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी पुष्पगुच्छ व शाल देऊन शुभेच्छा दिल्या. त्यावेळी कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे, राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस सावळाराम अनावकर, राष्ट्रवादी प्रदेश चिटणीस एम. के. गावडे, अबिद नाईक यांच्या कन्या इकरा नाईक, रिजा नाईक,राष्ट्रवादी कणकवली शहर अध्यक्ष इम्रान शेख, राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष  निशिकांत कडूलकर, राष्ट्रवादी अल्पसंख्याक प्रदेश महा सचिव शफीक खान, शहर उपाध्यक्ष गणेश चौगुले, जिल्हा सचिव सतीश पाताडे, जिल्हा सचिव प्रसाद कुलकर्णी, जिल्हा प्रतिनिधी सुशील चमनकर, राष्ट्रवादी दिव्यांग  सेल जिल्हाध्यक्ष साबाजी सावंत, राष्ट्रवादी दोडामार्ग महिला तालुकाध्यक्ष धारिनी देसाई, तालुका चिटणीस सत्यविजय परब, आदी उपस्थित होते.