शिवसेना उपनेते संजय आंग्रे यांच्याकडून मंत्री नितेश राणे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

Edited by: स्‍वप्‍निल वरवडेकर
Published on: June 23, 2025 14:23 PM
views 235  views

सिंधुदुर्ग :  शिवसेना उपनेते मा. श्री. संजय वसंत आंग्रे यांनी आज महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. श्री. नितेश राणे साहेब यांना वाढदिवसानिमित्त प्रत्यक्ष भेट घेऊन मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

या भेटीदरम्यान श्री. संजय आंग्रे यांनी मा. राणे साहेबांच्या कार्यकर्तृत्वाचे आणि जिल्ह्याच्या विकासासाठी त्यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या उपक्रमांचे विशेष कौतुक केले. जिल्ह्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी त्यांचे योगदान अत्यंत मोलाचे असून, मत्स्य व्यवसाय, पर्यटन व पायाभूत सुविधा यामधील त्यांच्या दूरदृष्टीतून संपूर्ण कोकणातील विकासाला चालना मिळत आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध विकासकामांबाबत सकारात्मक चर्चा झाली. याप्रसंगी प्रणय सावंत राजू बागवान हे उपस्थित होते.