नितेश राणेंच्या वाढदिवसानिमित्त खारेपाटण विभागात वृक्षारोपण

Edited by: स्‍वप्‍निल वरवडेकर
Published on: June 23, 2025 13:25 PM
views 19  views

 कणकवली : पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिनी शिवसेना पक्षाकडून खारेपाटण विभागात वृक्षारोपण करण्यात आले. खारेपाटण रेल्वेस्टेशन रोड, कोंडवाडी, भागात हेवृक्षारोपण करण्यात आले. यामध्ये जांभूळ,आंबा कलम, बेल आणि सोनचाफा अशी झाडे लावण्यात आली. याचे संपूर्ण संवर्धन करण्याची जबाबदारी शिवसैनिकांनी घेतली असून वृक्षारोपणाचा संदेश देण्याचे काम शिवसैनिकांनी केला आहे. या उपक्रमावेळी शिवसेना उपतालुका प्रमुख - मंगेश गुरव, विभाग प्रमुख - गुरुप्रसाद शिंदे, शहर प्रमुख - विश्वास राऊत, सचिन शिंदे व अन्य शिवसेनेचे कर्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.