
कणकवली : महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी येथील ओम गणेश निवासस्थानी मोठी गर्दी उसळली आहे. सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास मंत्री नितेश राणे यांचे ओम गणेश निवासस्थानी आगमन झाले. कार्यकर्त्यांनी फटाक्याची जोरदार आतषबाजी करत ढोल ताशांच्या गजरात नितेश राणे यांचे स्वागत केले. याप्रसंगी माझी जि प अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते